-->

ब्लॉगिंग ची सुरुवात कशी करावी २०२१ मध्ये . How to start Blogging in 2021 marathi

.

Sponsored Links


एक सफल ब्लॉग चालू करण्यासाठी ५ पायऱ्या. How To Start a Successful Blog in 5 Steps.

  1. ब्लॉग कोणत्या विषयावर लिहिण्याचा आहे तो विषय निवडा.
  2. ब्लॉग चे नाव विषयाशी जुळणारे असावे व त्या नावाने एक डोमेन विकत घेणे .
  3. ब्लॉग साठी एक जास्त स्पीड देणारी होस्टिंग  किंवा मोफत मध्ये blogger.com वरती ब्लॉग बनवणे.
  4. ब्लॉगची डिजाइन सुंदर अशी ठेवा.   
  5. ब्लॉग लिहायला सुरुवात अशी करा कि तुमचा लेख वाचकांना आवडेल. शक्यतो ब्लॉग लिहिताना आपण वाचक आहेत असे समजून ब्लॉग लिहावा. 

ब्लॉग चे डोमेन ठरवणे आणि विकत घेणे . Choosing Domain Name 

आपल्या ब्लॉग चे डोमेन नाव हे खूप महत्वाचे आहे कारण यामुळे आपल्या ब्लॉगचे नाव आपल्याला URL म्हणून ओळखता येते आणि ते वेब वरती एक URL  म्हणून उपलब्ध असते. ( उदा. www.wpnoobs.in  हे आमच्या ब्लॉगचे  नाव आणि URL आहे .)   

डोमेन नाव कोठून घ्यायचे? How to get Domain Name For Our Blog?

तर या वेब वरती खूप अश्या वेबसाईट आहेत ज्या डोमेन विकतात , तर या पोस्ट मध्ये मी एका वेबसाईट  बद्दल माहिती देतो त्या वेबसाईट वर डोमेन स्वस्तात मिळेल. तुम्ही सुरुवातीला .site .xyz .website .online .in .tech यापैकी कोणतेही डोमेन नाव एक्सटेंशन घेऊन ब्लॉग सुरु करू शकता कारण यांची किंमत कमी असते आणि रँक करण्यासाठी पण पॉवरफुल आहेत . यांची किमंत ७५ ₹   पासून सुरु होते चला तर मग पाहूया एक डोमेन विकत घेऊन .                          

  1. अगोदर  hostinger.in/domain-checker या वेबसाईट  वरती जाऊन तुमच्या विषयाशी निगडित असणारे डोमेन नाव सर्च करावे .आणि Add to Cart  वर क्लिक करून पुढे  Checkout वरती जाऊन पेमेन्ट करावे. खाली काही स्क्रीनशॉट देतो त्याप्रमाणे तुम्ही डोमेन घेऊ शकता.

buy domain in 75 ₹

डोमेन ऍड केल्यानंतर continue to cart  वरती क्लिक करा 

क्लिक करा कॉन्टीनुए टू कार्ट

आणि मग फायनल किमंत GST  सोबत दिसेल , नंतर checkout  Now  वर क्लिक करा .

सीलेक्ट करा तुमची पेमेंट पद्दत

कोणतंही पेमेंट पद्दत सिलेक्ट करा आणि मग तुमचे अकाउंट बनवून तुमची माहिती भरून Continue With Payment  वर क्लिक करून पेमेंट करा.

तुमची माहिती भरून पेमेंट करा

आता हे सगळे स्टेप करून झाले कि तुमचे डोमेन सफलता पूर्वक खरेदी करून झालेले आहे.

घेतलेले डोमेन नाव ब्लॉगर ला कसे जोडायचे ? How To Connect Domain To Blogger.com ?

ब्लॉगर वर तुम्हाला तुमचे अकाउंट लॉगिन करायचे आहे ज्या ब्लॉग मध्ये डोमेन नाव जोडायचे आहे तो ब्लॉग सिलेक्ट करावा आणि त्याच्या सेटिंग मध्ये जायचे . आणि पुढील स्टेप खालील फोटो मध्ये पहा.
Blogger settings

कस्टम डोमेन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक बॉक्स ओपन होईल त्या बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे डोमेन नाव टाकायचे आणि Save  करायचे.
add custome domain name

नंतर तुम्हाला समोर लाल कलर मध्ये Message  दिसेल त्यामध्ये तुम्हाला CNAME  रेकॉर्ड दिसतील ते रेकॉर्ड मी पिवळ्या कलर ने आखीत करतो ते रेकॉर्ड कॉपी करून तुमच्या hostinger  च्या अकॉउंट मध्ये डोमेन च्या सेटिंग मध्ये टाकायचे आणि मग काही वेळाने ३-५ तासाने नंतर डोमेन ऍड करून सेव्ह करावे मग तुमचे डोमेन ब्लॉगर ला सफलतापूर्वक जोडले जाईल.
get cname records


                                                                                                                                                     
नंतर तुम्हाला तुमच्या hostinger अकॉउंट मध्ये लॉगिन करून डोमेन्स च्या लिस्ट मध्ये जाऊन ते डोमेन सिलेक्ट करायचे . खालील फोटो प्रमाणे . 
सिलेक्ट डोमेन

DNS/Nameservers या वरती क्लिक करायचे आहे. 
क्लिक dns / nameservers
आणि तुम्हाला तुमच्या ब्लॉगर सेटिंग वरून भेटलेली रेकॉर्ड येथे टाकून सेव्ह करायचे आहे . पहिले जुने रेकॉर्ड सगळे delete  करायचे आहेत आणि नवीन रेकॉर्ड add  करायचे आहेत .
change records


ब्लॉग डिजाइन सुंदर कशी करावी? How To Create Attractive Blog Design? 

ब्लॉग ची डिजाइन हू खूप महत्वपूर्ण असते आपल्या ब्लॉगवर वाचक येण्यासाठी . जर तुमच्या ब्लॉग ची डिजाइन छान नसेल आणि Responsive  हि नसेल तर तुमच्या ब्लॉग वरती वाचक जास्त वेळ थांबणार नाहीत.ब्लॉगची डिजाइन चांगले प्रकारे ठेवण्यासाठी काही थिम म्हणजेच टेम्प्लेट बनवली जातात तुम्ही तुम्हाला आवडेल अश्या प्रकारचे एक  थिम तुमच्या ब्लॉग ला ठेवा.  


ब्लॉग लिखाण कसे करावे? How To Write Blog Post?

तुम्ही निवडलेल्या विषयावर ब्लॉग चे शीर्षक असायला पाहिजे , आणि ब्लॉग मध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत त्यांना Heading किंवा Subheading या टॅगने  दर्शवावे.

पोस्ट मध्ये कमीत कमी ३-५ पॅराग्राफ असावेत आणि जमले तर जिथल्या तिथे त्या रिलेटेड फोटोस वापरावे ज्याने वाचकाला आणखीन सोपे जाईल .

ब्लॉग मध्ये वापरलेले शब्द त्यांचे जर काही अर्थ होत असतील तर विकिपीडिया किंवा शब्धकोशाची  लिंक द्यावी. 
जर फोटोस दुसऱ्याचे वापरले असतील तर त्यांना क्रेडिट द्यावे .

अश्या प्रकारे तुम्ही २०२१ मध्ये ब्लॉगिंग ला सुरुवात करू शकता या ब्लॉग वर तुम्हाला खूप काही शिकण्यासाठी भेटणार आहे तर कृपया या ब्लॉग ला तुम्ही बुकमार्क म्हणून तुमच्या ब्राउजर मध्ये  जतन करा धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल . 

Related Posts